लालपाडी येथे बिबटया जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:45 IST2020-02-18T14:45:17+5:302020-02-18T14:45:31+5:30
चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

लालपाडी येथे बिबटया जेरबंद
चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गोदाकाठ भागात नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. काही दिवसापासून निफाड तालुक्यातील लालपाडी गावातील मोठया प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत होता. याबाबत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून येताच स्थानिक नागरिकांनी वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना माहिती दिली. वनविभागाने तात्काळ दखल घेत बिबटयाचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा बसविण्यात आला. लालपाडी येथील माणिक जगन्नाथ सानप यांच्या (गट क्र ७९) शेतात बसविलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबटयाला जेरबंद करण्यात आले. पिंजºयात अडकलेली बिबट मादी असून तिचे वय साधारण तीन वर्षे आहे. या जेरबंद मादीला निफाड येथील प्राणी नर्सरी येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. नंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून पुन्हा जंगलात सोडणार असल्याची माहिती भंडारी यांनी दिली. यावेळी वनपाल जी. बी. वाघ, वनपाल मनमाद ,व्ही. आर. टेकनर, भैय्या शेख, वनसेवक बोराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.