वृंदावन नगरमधून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:47 IST2019-07-14T17:47:22+5:302019-07-14T17:47:37+5:30
सिन्नर : झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीत पार्किंगमधून शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बजाज पल्सर मोटारसायकल लांबवली.

वृंदावन नगरमधून दुचाकीची चोरी
सिन्नर : झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीत पार्किंगमधून शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बजाज पल्सर मोटारसायकल लांबवली.
एकनाथ प्रभाकर कणकुसे यांच्या मालकीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एम. एच. १५ जी. एच. २१६६) ची चोरी झाली आहे. नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल उभी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सातवाजेच्या सुमारास त्यांना मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.