कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:34 IST2018-02-15T00:31:35+5:302018-02-15T00:34:11+5:30
मालेगाव : मालेगाव - मनमाड रोडवर कौळाणे शिवारात कंटेनर-कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार अनिस खान (३०, रा.धुळे) याचा मृत्यू झाला आहे तर चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देकंटेनर-कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातदुचाकीस्वार अनिस खान याचा मृत्यू
मालेगाव : मालेगाव - मनमाड रोडवर कौळाणे शिवारात कंटेनर-कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार अनिस खान (३०, रा.धुळे) याचा मृत्यू झाला आहे तर चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंटेनर क्रमांक (एनएल ०२ जे ७५८५) याच्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला (क्रमांक एमएच १८ एएस ९३१३) धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार खान याचा मृत्यू झाला. कारला धडक दिल्याने चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.