वृंदावननगरमधून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:00 IST2019-07-14T23:16:04+5:302019-07-15T01:00:54+5:30

झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली.

Bike theft from Vrindavanagar | वृंदावननगरमधून दुचाकीची चोरी

वृंदावननगरमधून दुचाकीची चोरी

सिन्नर : झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली. एकनाथ प्रभाकर कणकुसे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. कणकुसे यांनी आपली पल्सर दुचाकी (क्र. एमएच १५ जीएच २१६६) नेहमीप्रमाणे रात्री बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सातवाजेच्या सुमारास त्यांना मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bike theft from Vrindavanagar