दुचाकी झाडाला धडकून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:37 IST2020-12-25T21:14:46+5:302020-12-26T00:37:13+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील भानसगड शिवारात दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. भास्कर अर्जुन भोये (२३) असे मृताचे नाव आहे.

दुचाकी झाडाला धडकून एक ठार
भास्कर जातेगावकडून चिंचवडकडे टीव्हीएस कंपनीची अपाची दुचाकीवरून (क्र.एमएच १५ एचबी ७९३७) येत असाताना भानसगड शिवारात नियंत्रण सुटून दुचाकी निलगिरीच्या झाडाला धडकली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा लहान भाऊ दिनकर भोये याने हरसूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास हवालदार केशव धूम करीत आहेत.