खामखेडा परिसरात मोठ्या पाऊसाची शेतकऱ्यांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:50 IST2018-09-20T18:47:28+5:302018-09-20T18:50:04+5:30

खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला परतीच्या पाऊसाची अपेक्षा आहे.

 Big rain farmers hope in Khamkhheda area | खामखेडा परिसरात मोठ्या पाऊसाची शेतकऱ्यांना आशा

खामखेडा परिसरात मोठ्या पाऊसाची शेतकऱ्यांना आशा

ठळक मुद्देशेतकºयाची पूर्ण आशा आता परतीच्या पाऊसावर

खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला परतीच्या पाऊसाची अपेक्षा आहे.
पाऊसाची सुरवात हि रोहिणीच्या नक्षत्रापासून होते. तेव्हा रोहिणी नक्षत्र साधारण २४ मे पासून होत असली तरी या नक्षत्रात पाऊस येईल याची खात्री नसते.तेव्हा शेकºयाच्या दृष्टीने मृग नक्षत्रातील पाऊस फार महत्वाचा असतो. या नक्षत्राच्या पाऊसावर पिकाची पेरणी केली तर पिके चागला असतात.परंतु चालू वर्षी सुरु वातीचे रोहिणी आणि मृग नक्षत्र हि कोरडी गेली. मृगाच्या शेवटच्या चरण आणि आद्राच्या सुरवातीला पावसाला सुरु वात झाली तेव्हा शेतकºयाने या अल्पशा पाऊसावर खरिपाच्या बाजरी, मका, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिकाची पेरणी केली. परंतु त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. अधून- मधून येत जाणाºया पाऊसामुळे पिके आता पर्यत जोमात होती. परंतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्याच्या सुवातील पाऊस झाल्याने पिकांना तूर्त जीवदान मिळाले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पाऊसाने दांडी मारल्याने पिके कोमजू लागली आहेत. आता पिके फुलोरा व दाण्या भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांना पाण्याची अंत्यत आवश्यकता आहे. जर पाऊस झाला नाही तर कणीसात पूर्ण पणे धान्यानी भरणार नाही .त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्येता शेतकरी वर्गाकडून व्यक्त होताना ऐकाव्या मिळत आहे. तसेच डोगर परिसरात मोठा पाऊस न झाल्याने नाल्याना पूर आले नाहीत त्यामुळे शिवारातील धरणे, नालाबांध यांच्या पाणी साचले नाही. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.
आता पावसाळा संपला असून पाऊस परतीच्या मार्गाला लागला आहे. गेल्या वर्षी पण सुरवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. परंतु नंतर परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावल्याने नदी नाल्याना पाणी येऊन धरणे व नालाबांध पाण्या भरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरींना मोठ्या प्रमाणात उतरले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगल्या पैकी आले होते. या वर्षीही अजून पाहिजे तसा पाऊस झालेले नाही. विहिरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाणी उतरलेले नाही. आणि ज्याची काही विहिरींना पाणी आहे. ते फार अल्प आहे. ते केव्हा कमी होईल याची शास्वती नाही. त्यामुळे शेतकºयाची पूर्ण आशा आता परतीच्या पाऊसावर आहे. जरी परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला. तर रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा, कांदा आदी पिके घेता येतील.त्यामुळे रब्बी पिके चांगली येऊन रब्बीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Web Title:  Big rain farmers hope in Khamkhheda area

टॅग्स :Nashikनाशिक