शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:50 IST

Nashik Sudhakar Badgujar News: नाशिक येथे ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काल उद्धवसेनेत नाराजी असल्याची कबुली देताच आज संजय राऊतांच्या फोननंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Nashik Sudhakar Badgujar News: नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलावरून पक्षात नाराजी असल्याचे जाहीरपणे कबूल केले होते. नाशिकमधील १० ते १२ जण उद्धवसेनेत नाराज असल्याचेही बडगुजर म्हणाले होते. परंतु, यानंतर आता सुधाकर बडगुजर यांची थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊतांनी एक फोन केला आणि सुधाकर बडगुजर यांना काढून टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची याच पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. 

सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत

सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत. गिरीश महाजन बडबडले, शिवसेना राहणार नाही. शिवसेनेमुळे भाजप वाढली. तुम्हाला पालकमंत्री देता येत नाही आणि तुम्ही पक्ष संपवायला निघाले. ही शिवसेना कधीच संपणार नाही, सर्व कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. नाशिकमध्ये शिबिर झाले, त्यानंतर कसली नाराजी? अशी विचारणा यावेळी सूर्यवंशी यांनी केली. तसेच विलास शिंदे हे घरच्या विवाह सोहळ्यामुळे गेले काही महिने अत्यंत व्यस्त होते. आता ते पत्रकार परिषदेलाही हजर आहेत. परंतु, फोन करूनही बडगुजर आले नाहीत, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊतांचा फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांना पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराजी आहे. आता मी स्पष्ट बोलू शकत नाही. संघटनात्मक बदल झाले तेव्हापासूनच नाराजी पसरली आहे. संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे. संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळेच अनेक जण नाराज झालेले आहेत. संघटनात्मक बदल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत. वरिष्ठांपर्यंत त्या भावना गेलेल्या आहेत. स्थानिक नेत्यांना याबाबत माहिती आहे. राजाभाऊ जेव्हा खासदार झाले, तेव्हा मी असेन किंवा विलास शिंदे असेल, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजय खेचून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून तो विजय मिळवता आला, या शब्दांत सुधाकर बडगुजर यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. परंतु, आता लगेचच दुसऱ्या दिवशी सुधाकर बडगुजर यांची संजय राऊतांच्या एका फोनवर हकालपट्टी करण्यात आली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण