नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती

By संजय पाठक | Updated: September 20, 2022 13:51 IST2022-09-20T13:51:01+5:302022-09-20T13:51:42+5:30

Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत  जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे.

Big blow to Shiv Sena in Nashik, former corporator Praveen Tidme in Shinde group; Appointed as Metropolitan Chief | नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती

नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात; महानगर प्रमुखपदी झाली नियुक्ती

- संजय पाठक

नाशिक-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याचे तंत्र सुरूच असून आज या पक्षाचे माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत  जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे.

 शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे या गटात सामील झाले आहेत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे काही पदाधिकारी नाशिक महापालिकेत आले होते आणि त्यांनी म्युनिसिपल कर्मचारी सेना फोडण्याचा प्रयत्न केला होता.तिदमे यांनी त्याचा इन्कार केला असला तरी आज सकाळी त्यांनी समर्थकांसह वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदे गटात प्रवेश केला त्यांची एक वर्ष कालावधीसाठी महान प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Big blow to Shiv Sena in Nashik, former corporator Praveen Tidme in Shinde group; Appointed as Metropolitan Chief