भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:37 IST2018-02-09T01:37:26+5:302018-02-09T01:37:26+5:30

सिडको : भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़६) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील बूब पेट्रोलपंपासमोर घडली़

Bicycling killed in a car crash | भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सिडको : भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़६) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील बूब पेट्रोलपंपासमोर घडली़ यशवंत ढेरिंगे (५२, रा़ थेरगाव, वणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे़
थेरगाव येथील यशवंत ढेरिंगे हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाडीवºहेकडून थेरगावकडे दुचाकीने (एमएच १५, डीजी २०६१) जात होते़ मुंबई-आग्रा महामार्गावरील बूब पेट्रोलपंपासमोरून मुंबईकडून नाशिकला येणाºया शेव्हरलेट (एमएच ०४, ईएच ९२१२) कारने ढेरिंगे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ढेरिंगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मयत घोषित केले़ या अपघात प्रकरणी कारचालक प्रीतेश मकवानी यास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Bicycling killed in a car crash

टॅग्स :Accidentअपघात