कळवणला इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 00:19 IST2021-11-01T00:19:22+5:302021-11-01T00:19:56+5:30
कळवण तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

कळवण येथे इंधन दरवाढीविरोधात युवासेनेच्या सायकल रॅलीत सहभागी अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, मुन्ना हिरे, सुनील जाधव, तेजस जाधव, संभाजी पवार, साहेबराव पगार आदी.
कळवण : तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
कोर्ट परिसर ते बसस्थानक परिसरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेबरोबर शिवसेना कळवण तालुका व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अधिकारी सुनील पगार, उपतालुका अधिकारी तेजस जाधव, ऋतुराज पगार, मनोज आहेर, सनी पाटील तसेच शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख साहेबराव पगार, विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, विधानसभा संघटक संजय रौंदळ, नाशिक ग्रामीण सोशल मीडियाप्रमुख ललित आहेर, उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव, कक्ष शहरप्रमुख किशोर पवार, शिवसेना बूथप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, वसंत देसाई आदींसह शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले होते.