नागापुरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:21 IST2019-11-17T19:19:02+5:302019-11-18T00:21:43+5:30
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागापुरात बिबट्याची दहशत
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याचा संचार करीत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे.
तसेच मागील आठवड्यात नरहरी खालकर यांच्या शेळीवर रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसरात अजून दहशत पसरली आहे. नागापूर येथे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
या घटनांचा शेती कामावर परिणाम होत आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तरी या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घ्यावी व नागापूर परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.