भूषण लोंढेच्या जामिनाबाबत संभ्रम
By Admin | Updated: January 21, 2016 23:18 IST2016-01-21T23:15:37+5:302016-01-21T23:18:11+5:30
जय्यत तयारी : विवाहाची रंगली चर्चा

भूषण लोंढेच्या जामिनाबाबत संभ्रम
नाशिक : सातपूरला ‘पीएल’ग्रुपच्या कार्यालयात सराईत गुन्हेगारांच्या झालेल्या दुहेरी हत्त्याक ांडात सहभागी असल्याचा गुन्ह्यात नगरसेवकपुत्र भूषण प्रकाश लोंढे याच्या उच्च न्यायालयातील जामीन अर्जाबाबत संभ्रम असून, शुक्रवारी (दि.२२) भूषणचा विवाह समारंभ असल्याने तो होतो किंवा नाही याविषयी शहरात चर्चा होत आहे.
बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने लोंढेचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इरादा त्यांच्या निकटवर्तीयांनी बोलून दाखविला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी लोंढेच्या जामीन अर्जाबाबात पोलीस व न्यायालयीन वर्तुळात चर्चा झडली होती; मात्र तपासअधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी लोंढेच्या जामिनाबाबत पोलिसांकडे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या विवाह समारंभाविषयीदेखील संभ्रम व्यक्त केला जात असून, ज्या पद्धतीने लोंढे कुटुंबीयाकडून विवाह सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे, ते पाहता शुक्रवारी अज्ञातस्थळी हा समारंभ उरकून घेण्याची दाट शक्यताही पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)