वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:22 IST2018-05-31T14:22:19+5:302018-05-31T14:22:19+5:30

देवळा : वाखारी (पिं.) येथील भूमिपुत्र शहीद रावसाहेब आनंदा सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ग्रामपंचायत आवारात उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.

 Bhumi Pujan of the memorial of Shaheed Sonja at Wakari (P.) | वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

देवळा : वाखारी (पिं.) येथील भूमिपुत्र शहीद रावसाहेब आनंदा सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ग्रामपंचायत आवारात उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. वाखारी येथील लष्करी जवान शहीद रावसाहेब सोनजे यांना जम्मू काश्मीर मधील उधमपूर येथील लष्करी दवाखान्यात उपचार सुरू असतांना वीरमरण आले होते. देशसेवेसाठी गावच्या सुपुत्राने बलिदान दिल्याने यांच्या कार्याची पुढील पिढीला माहिती व्हावी, देशसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्याप्रति असलेली अभिमानाची भावना संपूर्ण गावकऱ्यांच्या मनात होती. त्यामुळे ग्रामपंचायत आवारात सोनजे यांचे स्मारक उभे करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकरे, रवी जाधव, वीरमाता हिरु बाई सोनजे, विरपत्नी आशाबाई सोनजे, भाऊसाहेब सोनजे, श्रावण सोनजे, सोसायटी चेअरमन विलास आहेर, रामदास बच्छाव, श्याम पवार, रतन पवार, दत्तू जगदाळे, संदीप जाधव, साहेबराव सोनजे, शरद सोनजे, उत्तम ठाकरे, भाऊसाहेब आढाव, रवी बच्छाव, दादा बच्छाव, कैलास बच्छाव, किशोर वाघ, आबासाहेब साळे, समाधान शिरसाठ, दिगंबर बच्छाव, यांसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title:  Bhumi Pujan of the memorial of Shaheed Sonja at Wakari (P.)

टॅग्स :Nashikनाशिक