लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील बोरवट येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित दोन दिव्यांग व्यक्तींची शबरी आवास घरकुल योजनेसाठी निवड केलेली आहे. त्यांच्या घरकुलाच्या पायाभरणीचा कार्यक्रम सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी माजी सभापती पुष्पा गवळी, पुंडलिक महाले, सरपंच सोनाली कामडी, चेअरमन पद्माकर कामडी, ग्रामसेवक बाळासााहेब मगर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो- ०४ पेठ घरकुल
बोरवठ येथे दिव्यांग लाभार्थी घरकुल योजनेच्या शुभारंभप्रसंगी विलास अलबाड, पुष्पा गवळी, सोनाली कामडी, पद्माकर कामडी, बाळासाहेब मगर आदी.