भुजबळसाहेब, एकदा रस्त्यावर उतराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:59+5:302021-09-25T04:13:59+5:30

जिल्ह्यातील अनेक रस्ते असे आहेत की, जे आजही त्यांचे भाग्य उजळण्याची वाट बघत आहेत. खड्ड्यांचे तर विचारु नका. बरेच ...

Bhujbal Saheb, once you get on the road! | भुजबळसाहेब, एकदा रस्त्यावर उतराच !

भुजबळसाहेब, एकदा रस्त्यावर उतराच !

जिल्ह्यातील अनेक रस्ते असे आहेत की, जे आजही त्यांचे भाग्य उजळण्याची वाट बघत आहेत. खड्ड्यांचे तर विचारु नका. बरेच रस्ते खड्ड्यांमध्ये हरविले आहेत. त्यामुळे अनेकदा छोट्या-मोठ्या अपघातांच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. वाहनांचे नुकसान, चालकांच्या मणक्यांचे नुकसान आणि प्रवाशांची गैरसोयदेखील नित्याची आहे. वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना याचा खूप रागही येतो, पण त्याला काहीही अर्थ नाही. खरे तर राग लोकप्रतिनिधींना यायला हवा, तेव्हाच काहीतरी सकारात्मक घडते. जेव्हा नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा फटका पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसला, त्यावेळी पत्रकारांनी खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा ‘राग येतो’ असे म्हणून भुजबळ यांनी खड्डे दुरुस्त होत नसतील तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही दिला. ही बातमी वाचताना केवळ महामार्गावरीलच नव्हे; तर ग्रामीण भागातील खड्ड्यांबाबतही भुजबळसाहेबांना राग यायला हवा आणि रस्त्यांचे भाग्य जर पालटणार असेल तर एकदा त्यांनी रस्त्यावर उतरायलाच हवे, अशी कुजबुज बागलाण बसस्थानकावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरू होती.

- संजय वाघ

240921\24nsk_21_24092021_13.jpg

रस्त्याची दूरवस्था

Web Title: Bhujbal Saheb, once you get on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.