शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भावली धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:40 IST

घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : आगामी काळात पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी सर्वप्रथम म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने पाऊस नाही, त्यामुळे धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र घाटमाथ्यावरील पावसामुळे भावली धरणातील जलसाठ्यात वाढ होत दोन दिवसांपासून भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास भावली धरण भरल्याची शुभवार्ता तालुक्याच्या कानी आली आणि तालुक्याची काहीशी चिंता दूर झाली.भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा, मुकणे, वैतरणा, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भयानक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. चोवीस तासात १०९ मिमी पावसाची नोंद मुंबई ठाण्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस असल्याने रात्रीपासून इगतपुरी तालुक्यातही धुवाधार पाऊस झाला; मात्र रात्रभर पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने पावसाचा हा आनंद औटघटकेचा ठरतो की काय अशी चिंता तालुक्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलैअखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण