भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:46 IST2021-02-26T17:46:07+5:302021-02-26T17:46:51+5:30

सायखेडा : भेंडाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती खालकर तर उपसरपंचपदी सोमनाथ खालकर यांची बहुमताने निवड झाली.

Bharti Khalkar as Sarpanch of Bhendali; Somnath Khalkar is the Deputy Panch | भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान

भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान

भेंडाळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले होते. आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी निघाले होते. राष्ट्रवादीकडे एकमेव महिला असल्यामुळे खालकर यांचा अर्ज दाखल झाला. भारती खालकर यांच्या अर्जावर किसन खालकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तर उपसरपंच सोमनाथ खालकर यांच्या अर्जावर शांताराम शिंदे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस. कानडे यांनी भारती खालकर यांच्या नावाची घोषणा केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष, गट-तट विसरून गावातील समस्या आणि विकास समोर ठेवून कामकाज करणार असल्याची ग्वाही खालकर यांनी दिली.
यावेळी शरद खालकर, किसन खालकर,, शांताराम शिंदे, कल्पना कमानकर, शोभा मोगल, रेखा आढाव, फाशाबाई पवार उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून तसेच फटाके फोडून जल्लोष केला.

Web Title: Bharti Khalkar as Sarpanch of Bhendali; Somnath Khalkar is the Deputy Panch