शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

भाम धरण : विस्थापितांच्या लढ्याला यश

By admin | Updated: January 29, 2016 22:40 IST

पुनर्वसन सपाट जागेवरच होणार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आलेल्या भरवज व निरपण या दोन प्रमुख गावांसह इतर तीन वाड्यांचे पुनर्वसन डोंगरावर न करता धरणाच्या पायथ्याशी सपाट जागेवर करण्यात यावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम होऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमिका विस्थापितांनी घेतल्याने अखेर याबाबत आमदार निर्मला गावित यांनी विस्थापतांची बाजू मांडीत सपाट जागेवरच पुनर्वसन करा, असे आदेश शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, याबाबत भाम धरणाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या आदेशाला हिरवा कंदील दिला असून, पुनर्वसन सपाट भूभागावर करण्याचे मान्य केले. पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी सपाटी भूभागावर व्हावे, अशी मागणी विस्थापितांनी गावित यांच्याकडे करून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.या मागणीची आमदार गावित यांनी दखल घेत शुक्र वारी (दि.२९) विस्थापित, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दरेवाडी, सारु क्तेवाडी आणि बोरवाडीच्या विस्थापितांनी डोंगरावरील पुनर्वसनास कडवा विरोध करीत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने गावित यांनी या तिन्ही वाड्यांचे पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी करा, असे आदेश दिला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, राघवेंद्र भाट आदिंसह शेकडो विस्थापित उपस्थित होते. भाम धरणाच्या विस्थापितांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. (वार्ताहर)