शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

भाजीमंडईत भिकाऱ्यांचा आश्रय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:42 IST

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे.

पंचवटी: महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. एकीकडे महापालिका सदर गाळ्यांचे लिलाव करणार असल्याचे जाहीर करीत असताना दुसरीकडे याच जागेचा भिका-यांनी ताबा घेतल्याने भाजीमंडईची जागा नेमकी कोणासाठी? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गंगाघाट परिसराला भेट देताना गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर असलेल्या भाजीमंडईचीदेखील पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांऐवजी चक्क भिकारी तसेच बेघर नागरिकांनी  आपले  बस्तान मांडल्याचे चित्र पालिका आयुक्तांना दिसल्याने त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना सूचना देऊन भाजीमंडई स्वच्छ करून तेथील बेघर नागरिकांना हटविण्याची मोहीम राबविली होती. त्यानंतर पालिकेने भाजीमंडईच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षक गायब झाल्याने गंगाघाट परिसरात फिरणाºया बेघर, भिकाºयांनी पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याने परिसराला अवकळा आली आहे. पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजीमंडईला झोपडपट्टीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पालिकेने भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या भाजीमंडईत कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता मनपा अधिकाºयांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.पूरामुळे बेघरांनी आश्रय घेतलापावसाने गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाºया नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने अनेकांनी जीव वाचवण्यासाठी महापालिकेच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेऊन तेथेच संसार थाटला.  पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक बेघरांना दिवसा व रात्री पावसापासून बचाव करण्यासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाºया अनेक बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच चूल मांडल्याने सध्या भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे.गोदावरी नदीला पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या व पाल उभारून राहणाºया बेघर नागरिकांनी आपल्या कपड्यांची गाठोडी करून लहान मुलांना खांद्यावर घेत महापालिकेच्या भाजीमंडईचा रस्ता धरला.  मनपाने भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांसाठी तयार केलेल्या ओट्यांवर सध्या बेघरांनी सहारा घेतला असून, भाजीमंडईलाच त्यांनी आपले निवासस्थान समजून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटलेले आहेत. भाजीमंडई सध्या भाजीविक्रेत्यांविना ओस पडून असल्याने गंगाघाट परिसरातील बेघर नागरिकांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका