शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कट्टा गँगकडून भरदिवसा युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:37 IST

उपेंद्रनगरला लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा संशयितांनी भरदिवसा युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शुभम पार्कजवळ घडली़ वैभव ऊर्फ बबलू विजय गांडुळे (२३, रा. शुभमपार्क, उपेंद्रनगर, सिडको) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित शुभम पेंढारे व त्याच्या साथीदाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देपूर्ववैमनस्य : शुभम पार्कजवळील घटना : अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा

सिडको : उपेंद्रनगरला लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा संशयितांनी भरदिवसा युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शुभम पार्कजवळ घडली़ वैभव ऊर्फ बबलू विजय गांडुळे (२३, रा. शुभमपार्क, उपेंद्रनगर, सिडको) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित शुभम पेंढारे व त्याच्या साथीदाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे सिडकोतील गुन्हेगारी व गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़अंबड पोलीस ठाण्यात निखिल रामदास सोनवणे (२५, रा़साई निवास, उपेंद्रनगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गणपती मंदिरात कार्यक्रम ठेवण्यात आले होते़ या कार्यक्रमाच्या ठिकाणी हॅलोजन लाइटची आवश्यकता असल्याने ते घेण्यासाठी निखिल सोनवणे व वैभव गांडुळे हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हिरोहोंडा डिलक्स दुचाकीने (एमएच १५, डीएन ७४२९) ने शुभम पार्क येथील सुमंगल मंडप डेकोरेटर्स येथे जात होते़ रस्त्याने जात असताना वैभव याने दोन मुलांकडे बोट दाखवून सांगितले की, चौकातील लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्यापासून शुभम पेंढारे व त्याचा साथीदार त्रास देत आहेत़ यानंतर या दोघांनी सुमंगल मंडपसमोर दुचाकी लावून हॅलोजन घेण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेला पेंढारे व त्याचा साथीदार यांनी वैभवसोबत वाद घालून तुला लई माज आला आहे, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली़ यानंतर पेंढारे याने कमरेच्या मागे लपविलेले तीक्ष्ण व धारदार हत्यार काढून ‘तुला लई खुजली होती ना भुगत आता’ असे म्हणून वैभवच्या छातीत खुपसले़ यावेळी निखिल सोनवणेमध्ये पडला असता त्यास धक्काबुक्की करून बाजूला केले़ तसेच तू बाजूला हो नाही तर तुलाही खपवून टाकू असे म्हणून दोघेही दुचाकीवरून माउली लॉन्सच्या दिशेने पळून गेले़यानंतर घटनास्थळी पडून असलेल्या वैभव गांडुळे यास निखिल सोनवणे, स्वप्नील, प्रेमसिंग शिंदे यांनी प्रथम कल्पतरू हॉस्पिटल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेनंतर शुभम पार्क भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार हत्यार जप्त केले असून, दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी सुरू केली आहे़ मयत वैभव गांडुळे हा सम्राटग्रुपमध्ये कामाला होता़ त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ, असा परिवार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून