विश्वासघात दिवस पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:07 IST2019-07-19T23:39:27+5:302019-07-20T00:07:59+5:30

धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे.

Betrayal will continue | विश्वासघात दिवस पाळणार

विश्वासघात दिवस पाळणार

ठळक मुद्देधनगर समाजाचे आंदोलन : फसवणूक झाल्याचा आरोप

नाशिक : धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे.
नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाविषयी माहिती देताना विक्रम ढोणे यांनी सरकाने आश्वासन देऊन ते पाळण्यास टाळाटाळ करून समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर एसटी आरक्षणाचे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा केंद्र्रबिंदू पुणे जिल्ह्यातील ‘बारामती’ होता. १५ जुलै २०१४ रोजी पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली. २१ जुलैला ही यात्रा बारामतीत पोहचली आणि आमरण उपोषणाला सुरू झाल्यानंतर २९ जुलैला हे उपोषण सोडवण्यासाठी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येऊन आपण सर्व अभ्यास करून आल्याचे सांगत सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आवाहनानुसार आंदोलकांनी उपोषण सोडले.
सरकारने शब्द पाळला नाही
फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाची फसणूक केली, असा आरोप करतानाच ज्या दिवशी आरक्षण लढ्यातील आंदोलकांनी फडणवीस यांच्या आश्वासनामुळे उपोषण सोडले तो दिवस संपूर्ण राज्यातील धनगर समाज ‘विश्वासघात’ दिवस म्हणून पाळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Betrayal will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.