शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

२८ लाख शिवभोजनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:21 PM

नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागरिकांना होत असून, राज्यात दि. १ ते २६ मेपर्यंत ८३० शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे

नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागरिकांना होत असून, राज्यात दि. १ ते २६ मेपर्यंत ८३० शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर राज्यातील एक कोटी ४६ लाख १५ हजार १७० शिधापत्रिकाधारकांना ६७ लाख ४५ हजार ४०० क्विंंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ९४ हजार २६१ क्विंंटल गहू, १५ लाख ३२ हजार २१६ क्विंंटल तांदूळ, तर २१ हजार २८४ क्विंंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले; परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख ७ हजार ४२७ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत आॅनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मेपासून एकूण एक कोटी ९ लाख ६२ हजार ७३४ रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील ४ कोटी ९२ लाख १४ हजार ५८४ लोकसंख्येला २४ लाख ६० हजार ७३० क्विंंटल तांदळाचे वाटप झाले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणाडाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५३ हजार ३५१ क्विंंटल डाळीचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.---------------------उपाययोजनेसाठी निधी४ राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल (केसरी) लाभार्थींना मे व जून २०२० या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन ७ लाख ५८ हजार १९० क्विंंटल धान्याचे वाटप केले.

 

टॅग्स :Nashikनाशिक