मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने गोठ्यांचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:37 IST2019-04-16T00:37:06+5:302019-04-16T00:37:30+5:30
चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने खासगी जागेतील दोन अनधिकृत जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे.

मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने गोठ्यांचे अतिक्रमण हटविले
नाशिकरोड : चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने खासगी जागेतील दोन अनधिकृत जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे.
जनावरांचे गोठे शहराच्या हद्दीबाहेर हलविण्याचा नोटिसा मनपाकडून वारंवार गोठे मालकांना देण्यात आल्या आहेत. महापालिका नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे सुरेश जानकीराम गवळी यांच्या मालकीचे पत्र्याचे शेड तसेच दोन जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.
गोठेमालकांचे धाबे दणाणले
गेल्या आठवड्यात खासगी जागेतील पाच-सात गोठे मनपा अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले होते. मनपाच्या धडक कारवाई गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे. याभागातील नागरिकांना गोठ्यातील मलमूत्राच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असल्याने यासंबंधी तक्रारी आल्या होत्या.