शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात

By suyog.joshi | Updated: January 10, 2024 16:27 IST

एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशकात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा म्हणजे भिकाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ठरणार आहे.  पंचवटीसह शहरातील सर्वच भिकाऱ्यांची रवानगी थेट निवारा केंद्रात केली जात आहे. एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून शहरातील भिकारी शोधण्यासाठी जोरदार शोध मोहीम राबवली जात आहे. निवारा केंद्रात भिकाऱ्यांना दोनवेळचे जेवण, रात्री झोपण्यासाठी व्यवस्था व थंडीपासून बचावासाठी ब्लेकटही दिले जात आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि.१२) युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येणार असून तपोवनातील मैदानावर हा सोहळा होणार आहे.

मनपा आयुक्तांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात शहरात कुठेही भिकारी दिसता कामा नये असे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत. फर्मान जारी होताच अतिक्रमण विभागाने भिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. भिकारी दिसताच त्याला निवारा केंद्रात नेले जात आहे. विशेषत: पंतप्रधानांचा दौरा हा पंचवटी परिसरात आहे. या ठिकाणी रामकुंड, गोदा घाट व अनेक मंदिरे असून या ठिकाणी भिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक भाविक व पर्यटक या ठिकाणी भेट देत भिकाऱ्यांना अन्नदान व पैसे देतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो.पोलिसांकडून भिकाऱ्यांची तपासणीशहरात महापालिकेच्यावतीने दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारली आहेत. तपोवन व गाडगे महाराज धर्मशाळेत निवारा केंद्र आहे. साधारण दोन्ही केंद्रात सद्यस्थितीत ३०० भिकारी आहेत. त्यामुळे अजून एक दोन दिवसात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दौर्यामुळे तपोवन निवारा केंद्रातील सर्व आश्रितांची पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी केली जात आहे. सर्व भिकाऱ्यांना गाडगे महाराज धर्मशाळेत ठेवले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक