चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:16 IST2019-06-25T01:15:49+5:302019-06-25T01:16:11+5:30

देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 Because of the thieves, the citizens were forced to stay out of the night | चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून

चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या सहाणे कुटुंबीयातील मुलाला घराजवळील शेजाऱ्यांच्या अल्टो मोटारीचे कोणीतरी लॉक खोलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्याने चोर चोर असा ओरडा करताच ३-४ जणांनी तेथून पळ काढला पण ते अंधाराकडे न जाता समोरील बंगल्याकडे पळाले. दरम्यान तेथील राजेंद्र श्रीवंत, शिरसाट, भागवत, कटारे, खैरनार कुटुंबीयांंनी एकमेकांना फोनद्वारे संपर्क करत सावध केले. दरम्यान, पोलिसांना चोरांबाबत माहिती कळवली होती. पोलीस घटनास्थळी आले अन् माहिती घेऊन गेलेही पण परिसरात पहाटे चारपर्यंत नागरिकांनी पहारा देत रात्र काढली. दरम्यान, वर्षभरापूर्वी विजयनगर येथील डॉ. सोनी यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याची आठवण करत विजयनगरमध्ये किती घरांचे कुलूप तोडून व घरात घुसून चोरी करण्यात आली याचीच चर्चा परिसरात रंगत होती. भगूरमध्ये दोन महिन्यांत फर्निचरच्या दोन दुकानांचे शटर तोडून टीव्ही चोरण्यात आले.

Web Title:  Because of the thieves, the citizens were forced to stay out of the night