इस्कॉन मंदिरात विग्रहांचा मनमोहक शृंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:46 AM2019-02-11T00:46:10+5:302019-02-11T00:46:39+5:30

वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध भागात निरनिराळ्या प्रकारे साजऱ्या होणाºया वसंतोत्सवाचे स्वागत नाशिकमधील इस्कॉन मंदिरात रविवारी (दि.१०) पहाटे ५ वाजचा मंगल आरतीने करण्यात आले.

Beautiful makeup of the Vichars at the ISKCON Temple | इस्कॉन मंदिरात विग्रहांचा मनमोहक शृंगार

द्वारका येथील इस्कॉन मंदिरात वसंत पंचमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कृष्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांनी सजविलेले मंदिर विद्युतप्रकाशात अधिकच खुलून दिसत होते.

googlenewsNext
ठळक मुद्देवसंतोत्सव : पिवळ्या फुलांंची आकर्षक सजावट

नाशिक : वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध भागात निरनिराळ्या प्रकारे साजऱ्या होणाºया वसंतोत्सवाचे स्वागत नाशिकमधील इस्कॉन मंदिरात रविवारी (दि.१०) पहाटे ५ वाजचा मंगल आरतीने करण्यात आले.
वसंतोत्सवाचे औचित्य साधत इस्कॉनच्या श्रीश्रीश्री राधा मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली होती. सर्व सजावट ही पिवळ्या रंगात करण्यात आली होती. गेल्या ३ दिवसांपासून या सजावटीसाठी तयारी सुरू होती. यात शेवंती, झेंडू, अस्टर, जरबेरा, आॅर्किड, डच गुलाब अशा विविध प्रकारच्या पिवळ्या फुलांचा समावेश आहे.

Web Title: Beautiful makeup of the Vichars at the ISKCON Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.