दोघांना मारहाण करीत कारसह रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:44 IST2019-10-19T21:43:27+5:302019-10-19T21:44:19+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील दोघा युवा शेकऱ्यांना रात्री एकाटोळीने आडवून त्याच्याजवळी, भाजी पिकेलेली रोकड व त्यांची कार घेवून पोबारा केला.

दोघांना मारहाण करीत कारसह रोकड लांबविली
वणी : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील दोघा युवा शेकऱ्यांना रात्री एकाटोळीने आडवून त्याच्याजवळी, भाजी पिकेलेली रोकड व त्यांची कार घेवून पोबारा केला.
तालुक्यातील खुंटीचा पाडा भागातील जीवन ज्ञानेश्वर गायकवाड (२६) व लहु सोमा गवळी (२५) हे दोघे युवक (एमएच १५ जीआय ०८२४) ईरीटीका कारने नाशिकच्या बाजार समितीत दोन पोते घेवडा विक्र ीसाठी घेऊन गेले होते. विक्र ी करु न हे दोघे परतीच्या प्रवासात असताना वनारे परिसरात रस्त्यावर मोटरसायकल लावून रस्ता अडविला असल्याचे निदर्शनास आले. आडव्या मोटार सायकलमुळे नाईलाजाने कारची गती त्यांना कमी करावी लागली. त्यावेळी अचानक चार ते पाच जणांच्या टोळक्याने कारच्या दिशेने धाव घेत या दोघांना मारहाण करु न गंभीर जखमी केले व धाक दाखवुन रोख रक्कम व कार घेवून पलायन केले.
त्यानंतर जखमी अवस्थेत हे दोघे कसेबसे ननाशी येथील रु ग्णालयात पोहचले. तेथे प्राथमिक उपचार त्यांचेवर करण्यात आले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने वणीच्या ग्रामिण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. सदर माहीती पोलिसांना मिळताच त्यांनी तपास सुरु केला. मात्र गुन्हेगारांचा शोध लागला नाही.या प्रकरणी जबरी ळूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.