डॉक्टरला मारहाण; तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:14 IST2020-08-04T22:53:45+5:302020-08-05T01:14:34+5:30

सिडको : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रुग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३) घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Beating the doctor; Three gajaads | डॉक्टरला मारहाण; तिघे गजाआड

डॉक्टरला मारहाण; तिघे गजाआड

ठळक मुद्देतीन दिवसांची पोलीस कोठडी : सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रुग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३) घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यात पंचवटी परिसरातील एका महिला रुग्णाला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्ण दगावला. मृत्युपश्चात सदर महिला रुग्णाचा कोरोना नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. यानंतर महिलेच्या काही नातेवाइकांनी जाब विचारण्यासाठी सोमवारी रुग्णालय गाठले. संध्याकाळच्या सुमारास अंबडलिंकरोडवरील रुग्णालयात चार ते पाच इसमांनी धडक देत रुग्णालयाच्या डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी एका इसमाने थेट डॉक्टरला मारहाण केली. हा सगळा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला. या कॅमेºयाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरुद्ध तक्रार देत घडलेला प्रकार कथन केला. यावेळी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांच्या टोळक्याने रुग्णालयातील साहित्याचीसुद्धा तोडफोड केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावरून खात्री करत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेत कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टरांना सुरक्षा देत डॉ. पाटील यांच्यावर हल्ला करणाºया हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांच्या वर्णनावरून माग काढत पंचवटी परिसरातून पीयूष उल्हास राजूरकर (३०, रा.गुंजाळबाबानगर, हिरावाडी), आकाश अशोक पाटील (२६, वाल्मीकनगर, वाघाडी), संग्राम बबन बारकू-पाटील (४४, रा.पाण्याच्या टाकीजवळ, वाघाडी) यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी वैद्यकीय सेवा, व्यक्ती संस्था हिंसक कृत्य व मालमत्ता हानी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating the doctor; Three gajaads