बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक; वाहनांचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 02:07 PM2019-09-01T14:07:08+5:302019-09-01T14:09:20+5:30

धडक इतकी गंभीर होती की, दुचाकी-चारचाकी जागेवरच पेटली. काही क्षणात आगीचा भडका उडाल्याने दुचाकीचा जळून कोळसा झाला.

Beat Marshall cops hit two-wheeler; Vehicles explode | बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक; वाहनांचा उडाला भडका

बीट मार्शल पोलिसांच्या दुचाकीला धडक; वाहनांचा उडाला भडका

Next
ठळक मुद्देदोघे पोलीस कर्मचारी गंभीरपणे जखमी आगीचा भडका उडाल्याने दुचाकीचा जळून कोळसा

नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी (बीट मार्शल) रात्रीच्या पोलीस गस्तीवर जात असताना पोलीस ठाण्यापुढेच एका भरधाव जाणाऱ्या मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे पोलीस रस्त्यावर कोसळले यावेळी त्यांच्या दुचाकीने जागेवर पेट घेतला. या घटनेत दोघे पोलीस कर्मचारी गंभीरपणे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जमा केले असून वाहनमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पोलीस देविदास शिंदे राजाराम ढाले (बीट मार्शल) हे दोघे रात्रीच्या गस्तीवर शासकिय दुचाकीवर होते. दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्यात येत असताना रात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यापुढे सिन्नरच्या दिशेने जाणाºया भरधाव टाटा नॅक्सॉन कारने (एम.एच१५ जीआर १११९) बीट मार्शलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की, दुचाकी-चारचाकी जागेवरच पेटली. काही क्षणात आगीचा भडका उडाल्याने दुचाकीचा जळून कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. लिडिंग फायरमन मोहन मधे, अशोक निलीमनी, मनोज साळवे, राजेंद्र आहेर, श्याम काळे, सुनील ताक, मंगेश गोसावी या जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित साहील नितीन ठाकरेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक जे.के.गोसावी करीत आहेत.

 

Web Title: Beat Marshall cops hit two-wheeler; Vehicles explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.