शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर वाहतूक वाहनांवर वजन काटे

By admin | Updated: October 21, 2015 23:54 IST

ग्राहक संरक्षण परिषद : तक्रारींचा वर्षाव

नाशिक : गॅस सिलिंडरच्या वजनात तफावत आढळल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत सिलिंडर वाहतूक करणार्‍या वाहनांवर यापुढे वजन काटे ठेवण्याच्या सूचना ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले आहेत.

बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परिषदेच्या सदस्यांकडून ग्राहकांच्या हिताकडे होणार्‍या दुर्लक्षाच्या तक्रारींचा वर्षाव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने सिलिंडरच्या वजनात तफावत, रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे न होणारी भाडे आकारणी, छापील किमतीपेक्षाही अधिक किमतीने होणारी बाटली बंद पाण्याची विक्री, आर्थिक डबघाईस गेलेल्या पतसंस्था, बॅँकांच्या ठेवीदारांची परतफेड, वीज बिलाची वाढीव आकारणी अशा विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यावर प्रत्येक तक्रारनिहाय उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला. गॅस एजन्सीचालकांनी गॅस सिलिंडरचे वितरण करताना प्रत्येक ग्राहकाला त्याचे वजन करून देण्याचे व त्यासाठी सिलिंडरची वाहतूक करणार्‍या वाहनांवर वजन काटे ठेवण्याची सूचना करण्यात आली. गॅस ग्राहकाचे त्यामुळे समाधान होऊन तक्रारींना आळा बसेलच; परंतु गॅस चोरीच्या घटनाही टाळणे सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले. बाटलीबंद पाण्याची वाढीव दराने विक्री करणार्‍या ठिकाणांवर वजन माप विभागाच्या अधिकार्‍यांनी खात्री करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिक्षा थांब्यावर भाडे आकारणीचे दरपत्रक लावण्यात यावे, रेशन दुकाने वेळेवर उघडावीत यासाठी दुकानदारांना समज देण्याचे ठरविण्यात आले. ग्राहक हिताला बाधा आणणार्‍या प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या चाकोरीत बसवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीकडे खाते प्रमुख असलेले जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदि अधिकार्‍यांनी पाठ फिरविली.