बिर्याणी खाण्याच्या वादातून लासलगावी एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:28 IST2019-04-09T19:27:46+5:302019-04-09T19:28:59+5:30
लासलगाव : पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारतळ येथे बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना सोमवारी (दि.८) घडली.

बिर्याणी खाण्याच्या वादातून लासलगावी एकास मारहाण
लासलगाव : पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारतळ येथे बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना सोमवारी (दि.८) घडली.
संजय नगर येथील सुरेश सहादु पाथरे यास लाथा बुक्याने मारहाण करत जखमी केले आहे. या भागामध्ये हातगाड्यावर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारूची विक्र ी केली जाते. आणि यातून वाद होत या परिसरामध्ये मोठी दहशत माजवली जाते सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषत: महिलांना या भागातून सायंकाळी चालणे सुध्दा मुश्कील होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सुरेश पाथरे हा शमसुद्दीन असलम शेख यांच्या हातगाडीवर बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. आॅर्डर देऊनही बिर्याणी येत नसल्याने सुरेश पाथरे व शमसुदिन शेख, इम्रान अकील मंन्सुरी, मोसिन अकील मन्सुरी, मुजमिल इरफान शेख यांच्यात बाचाबाची झाली, त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
इम्रान मन्सुरी याने गाड्या जवळच असलेली खुर्ची उचलत फिर्यादी सुरेश पाथरेच्या डोक्यात मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी सुरेश पाथरेला ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. जोपळे पुढील तपास करीत आहेत.