शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

बारदान फाटा शंभर फुटी रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

जात पडताळणी विभागाकडून अडवणूक नाशिक : कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची जात पडताळणी झालेली असेल तर त्यास वैधता प्रमाणपत्र दिले ...

जात पडताळणी विभागाकडून अडवणूक

नाशिक : कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची जात पडताळणी झालेली असेल तर त्यास वैधता प्रमाणपत्र दिले जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले असतानाही जात पडताळणी विभागाकडून अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक दुर्मीळ कागदपत्रे पुरावा म्हणून मागितली जात असल्याने पालक आणि विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

जुने नाशिकमधील प्रसूतिगृह बंद अवस्थेत

नाशिक : जुने नाशिमधील मुलतानपुरा येथे बांधण्यात आलेले प्रसूतिगृह अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. या ठिकाणी महापालिकेने तीन मजली इमारत उभारली आहे. परंतु अद्यापही ती उपयोगात आणलेली नाही. सदर प्रसूतिगृह रुग्णालय सुरू करण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आलेली आहे. मात्र मनपाकडून याबाबतची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सिडकोत मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौकात असलेल्या हॉस्पिटलमध्ये शिबिर होणार आहे. मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोदाघाटावरील राहुट्या उठल्या

नाशिक : गोदाकाठावरील गौरी पटांगण येथे मजुरांच्या राहुट्या आता उठविण्यात आल्या आहेत. शहरात मोलमजुरी करण्यासाठी आलेले मजूर गोदाकाठी राहुटी टाकून राहतात. दिवसभर काम करून हे मजूर गोदाकाठावर परततात. आता येथे काम सुरू असल्याने येथील राहुट्या उठविण्यात आलेल्या आहेत.

शाळा सुरू झाल्याने रस्ते गजबजले

नाशिक : शाळा सुरू झाल्यामुळे रस्ते पुन्हा गजबजले आहेत. सकाळच्या सुमारास रस्त्यावर आता सायकलवर जाणारे विद्यार्थी, तसेच पालकांची वाहने दिसू लागली आहेत. सध्या शालेय वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी सकाळी रस्त्यावरील वर्दळ वाढल्याचे दिसते.