बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 06:46 PM2020-09-25T18:46:34+5:302020-09-25T18:47:04+5:30

सिन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र माविषयी बारागाव पिंप्री महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी विद्यार्थ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,क्र ीडा विभाग,विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्र म राबविण्यात आला.

At Baragaon Pimpri College, my family, my responsibility, my undertaking | बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन

बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देकामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर प्रथम स्वत: निर्जंतुक व्हायचे आहे.

सिन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र माविषयी बारागाव पिंप्री महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी विद्यार्थ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,क्र ीडा विभाग,विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्र म राबविण्यात आला.
देशावर अचानक ओढवलेल्या भयंकर संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून धैर्याने करायचा आहे. आपण आपली कामे आणखी जास्त दिवस बंद ठेवू शकत नाही हे सर्वांना ज्ञात आहे पण तरी आपली जबाबदारी सांभाळत आपली व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्राचार्य फरताळे यांनी सांगितले. कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर प्रथम स्वत: निर्जंतुक व्हायचे आहे. त्यासाठी आल्यावर घातलेले कपडे गरम पाण्यात टाकून स्वत: अंघोळ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. असे केल्याने आपण स्वत:चे , आपल्या कुटुंबाचे तसेच अप्रत्यक्षपणे समाजाचे संरक्षण करणार आहोत. मास्क लावताना तो व्यविस्थत लावला आहे की नाही याची खातरी करून घेणे गरजेचे आहे.तसेच वापरलेला मास्क वेळच्या वेळी स्वच्छ धुवून मगच वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. डिसपोजेबल मास्क असतील तर त्याचीही योग्य ती विल्हेवाट लावली जाणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कोरोना काळात आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन अप्रत्यक्षपणे संपूर्ण समाजाला कशी मदत करू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्राध्यापक मंगल सांगळे यांनी केले.
कोरोना संक्र मण काळात घ्यावयाचा आहार, कोरोना लक्षणे , प्रतिकारशक्ती वर्धक उपाय याबद्दल मार्गदर्शन सहा. प्राध्यापक सुजाता डावखर यांनी केले.
कोरोना संक्र मण काळात योग्य खबरदारी व आहारासोबतच उपयुक्त प्राणायम ,व्यायाम याचे महत्व प्रात्यिक्षकांद्वारे विशद करण्याचे काम क्र ीडा विभाग प्रमुख व क्र ीडा संचालक मंजुश्री उगले यांनी केले.
कार्यक्र माचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहा. प्राध्यापक संदीप कापडी यांनी केले. प्रा. ललित गांगुर्डे यांनी आभार मानले.


 

Web Title: At Baragaon Pimpri College, my family, my responsibility, my undertaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.