वणी चौफुलीने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:49 IST2019-02-16T17:49:38+5:302019-02-16T17:49:53+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात मुख्य बाजारपेठ, वणी चौफुली भागात रस्ते प्राधिकरण विभागाने हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेले अतिक्र मण हटविण्यात आले.

वणी चौफुलीने घेतला मोकळा श्वास
पिंपळगाव बसवंत : शहरात मुख्य बाजारपेठ, वणी चौफुली भागात रस्ते प्राधिकरण विभागाने हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेले अतिक्र मण हटविण्यात आले. त्यामुळे शहरातील वणी चौफुली परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
सुरत-शिर्डी महामार्गावर वडापावच्या हातगाड्यावर व्यवसाय थाटले होते. शिर्डी सुरत महामार्गाच्या कामाला वेग आला असून, विकासाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या बेकायदेशीर अतिक्र मण केलेल्या पाववडा व्यावसायिकांच्या हातगाड्यांवर हातोडा पडला असून, त्यामुळे वणी चौफुलीवर वाहतूक कोंडीच्या होणाºया त्रासाला मोकळा श्वास मिळणार आहे.
या परिसरात मोठ्याा प्रमाणांवर व्यसायिकांनी दुकाने लावून अतिक्र मण केले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत असे. वणी चौफुली व शासकीय विश्रामगृह परिसरापर्यंत हातगाडीधारकांनी रस्ता अडवून व्यवसाय सुरू केला होता. यामुळेदेखील वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत होते.