शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

By admin | Updated: February 28, 2015 23:44 IST

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून उन्हाळ्याकडे सुरू झालेली वाटचाल आणि वातावरणात पसरलेला उष्मा अचानक आलेल्या पावसामुळे थंडीत परावर्तीत झाला आणि नाशिककरांनी रात्री पुन्हा थंडी अनुभवली. या थंडीची तीव्रता राज्यात सर्वाधिक होती. जानेवारीच्या मध्यापासून वातावरणातील उष्मा वाढू लागला होता. हे तपमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. आता उन्हाळा कडाक्याचा पडणार आणि वैशाख वणव्याची झळ पोहोचणार, असा अंदाज वर्तविला जात असतानाच अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. सकाळपासूनच आलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसभर थंडीची जाणीव होत होती आणि पाऊस पडेल, असा अंदाज होता. अखेर दुपारी ४ च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यावरील विक्रेत्यांचे हाल झाले. अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. शहरासह उपनगरांमध्येही झालेल्या पावसाने चाकरमान्यांची, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शाळा सुटण्याच्या वेळेस सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने घर गाठावे लागले, तर अनेक विद्यार्थी भिजतच घरी परतले. कार्यालये सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनाही ओलेचिंब होऊन घर गाठावे लागले. त्यामुळे खासगी वाहनांना मागणी वाढली होती.राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हजेरी लावली. यामुळे आंब्याचा मोहोर आणि गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले. गुजरात सीमेवर तसेच कच्छ परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, येते एक-दोन दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री दहानंतर पावसाचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे गारठ्यात भर पडली. (प्रतिनिधी)