येवल्यात बळीराजा गौरव दिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 19:02 IST2021-11-05T19:01:32+5:302021-11-05T19:02:43+5:30

येथे सत्यशोधक संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

baliraja Gaurav Din celebrate in Yeola nashik | येवल्यात बळीराजा गौरव दिन 

येवल्यात बळीराजा गौरव दिन 

येवला (नाशिक) : येथे सत्यशोधक संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मिरवणूकीचा कार्यक्रम रद्द करुन मोजक्याच कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम केला. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांची व सत्यजित यांनी अभिवादन गित गायलं. विविध फळांचे वाटप यावेळी करण्यात आले. काॅ. भगवान चित्ते, दिपक पाटोदकर, नितीन संसारे, शिवाजी वाबळे, श्रावण पा. देवरे यांनी या वेळी बोलताना बळीराजाच्या संस्कृतीक इतिहासावर प्रकाश टाकला. सम्राट बळीराजाचा जय जयकार करत आधुनिक भांडवलशाहीचा निषेधही यावेळी करण्यात आला. 

कार्यक्रमास माजी नगरसेवक चहाबाई अस्वले, सुंदर जाधव, सुनिता जाधव, रमेश खैरनार, अरुण खैरनार, खंडू खैरनार, धोंडीराम पडवळ, दीपक लाठे, मंगला खरात, सुमनबाई साळवे, छाया खंडागळे, रखमाबाई बोडके, राहुल शेलार, संकेत जाधव, ऐश्वर्या चित्ते आदी उपस्थित होते.
 

Web Title: baliraja Gaurav Din celebrate in Yeola nashik

टॅग्स :Nashikनाशिक