शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा हवालदिल : द्राक्षासह कांदा पिक धोक्यात

By admin | Updated: February 28, 2015 23:56 IST

जिल्ह्यात बेमोसमी पाऊस

नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, निफाडसह जिल्ह्यात शनिवारी बेमोसमी पावसाने पावसाने हजेरी लावली. द्राक्षे, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.दिंडोरी : अवेळी आलेल्या पावसाने दिंडोरी व परिसरात द्राक्षे, गहू व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास दिंडोरी, तळेगाव लखमापूर, करंजवन, वणी, पांडाणे, ओझरखेड, खेडगाव, जऊळके आदि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतपिकाचे नुकसान झाले. द्राक्ष खुडणीचा हंगाम सुरू झाला असल्याने बेमोसमी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. पावसामुळे द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी आता कमी बाजारभावात द्राक्ष खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. वाढती महागाई, बी-बियाणे रासायनिक खते व औषधे यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ व सततचा अवेळी येणारा पाऊस या सर्व परिस्थितीचा सामना करत येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष, गहू आदिंसह भाजीपाला पिके घेतली; परंतु या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कसबे सुकेणे - कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात शनिवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास बेमोसमी पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला असून, बेदाणा उत्पादकांनीही चिंता व्यक्त केली आहे. कसबे सुकेणे परिसरात अडीच वाजेच्या सुमारास मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. दुपारी १ वाजेनंतर वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण होऊन निफाड तालुक्यातील निफाडसह बाणगंगा काठच्या कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे दीक्षी या परिसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. वणी - वणी परिसरात हलक्याशा पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे पावसाचे संकेत प्राप्त होत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गार वारे वाहू लागले. पावसाची चाहुल जाणवत असताना पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे फारसे नुकसान होणार नसले तरी ज्या द्राक्षबागाची खुडणी सुरू आहे त्यावर प्रतिकूल परिणाम झाला. येवला - शहर व परिसरात पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. परिसरातील अनेक ठिकाणी विजेने दडी मारली. ऐन परीक्षेच्या हंगामात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पावसामुळे तपमानात घट झाली असली तरी सारे ऋतुचक्र बदलले आहे.खामखेडा - परिसरामध्ये सकाळी ११ वाजेपासून ढगाळ वातावरण होते. सध्या सर्वत्र रागडा कांदा काढणीचा हंगामा चालू असल्याने शेतामघ्ये सर्वत्र कांद्याचे ढीग उघड्यावर होते. तसेच काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली असल्याने आणि तोही उघड्यावर शेतात होता. दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होते. पावसाची शक्यता नव्हती. परंतु सायंकाळी अचानक ६ वाजेच्या सुमारास सुरुवातीस जोरात वारा येऊन तुरळक पावसाच्या सरी पडू लागल्याने शेतकऱ्यांची शेतातील उघड्यावर असलेला कांदा व गव्हू झाकण्यासाठी धावपळ उडाली. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे शेतातील उभा गहू पडून गेला. त्यामुळे गव्हाचे नुकसान होईल की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.लासलगाव - शनिवारी दुपारी अचानक झालेल्या पावसाने लासलगाव जलमय होऊन रोगट वातावरण तयार झाले. थंडीने लासलगावकर गारठले. अचानक झालेल्या पावसाने लासलगावचे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. कांदा व मका व्यापारी वर्गाला या पावसाने माल झाकणे मुश्कील झाले. मनमाड - शहर व परिसरात तुरळक पावसाचा शिडकावा झाला असून, वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारनंतर वादळीवाऱ्यासह किरकोळ पावसाचा शिडकावा झाला. (लोकमत चमू)