बागलाण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:58 IST2019-04-06T18:56:21+5:302019-04-06T18:58:12+5:30
औदाणे : बागलाण तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस तर सरचिटणीसपदी दादाजी पगारे यांची बिनविरोध निवड झाली.

बाळासाहेब कापडणीस
ठळक मुद्देसरचिटणीसपदी दादाजी पगारे यांची बिनविरोध निवड
औदाणे : बागलाण तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कापडणीस तर सरचिटणीसपदी दादाजी पगारे यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्हाकार्याध्यक्ष भाऊसाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरीत तालुका कार्यकारीणी अशी कार्याध्यक्ष विश्वास धोडगे, कोषाध्यक्ष श्रीमती रजनी अहिरे उपाध्यक्ष सुनिल निकम, ज्योती चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व मुख्याध्यापक पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.