त्रिंगलवाडीत भरला बालआनंद मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:21 PM2019-02-15T14:21:44+5:302019-02-15T14:21:55+5:30

इगतपुरी : आदिवासी बहुल भागातील मुलामुलींना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवसायांचे शिक्षण मिळावे व विविध व्यवहारांचे ज्ञान व्हावे या उद्देशाने तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील त्रिंगलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Balanand meet in Thrillingwadi | त्रिंगलवाडीत भरला बालआनंद मेळावा

त्रिंगलवाडीत भरला बालआनंद मेळावा

googlenewsNext

इगतपुरी : आदिवासी बहुल भागातील मुलामुलींना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवसायांचे शिक्षण मिळावे व विविध व्यवहारांचे ज्ञान व्हावे या उद्देशाने तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील त्रिंगलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात पत्र्याचीवाडी , निशाणवाडी, तळ्याची वाडी गिरणाईवाडी ,हिरूचीवाडी व दगडवाडी येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी उर्त्स्फूत सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स उभारु न ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. बालआनंद मेळाव्याचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोकणे ,सरपंच हिराबाई पारधी , मुख्याध्यापक गोरखनाथ परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक उपशिक्षक विजय पगारे यांनी केले. यावेळी पोलीस पाटील सुरेश कोकणे, दिनकर कोकणे, संगिता पारधी , शांताराम शेलार ,रेणुका शिरसाट , पुष्पा कोकणे, रामदास काठे, काळु भगत, मंजुळा कोकणे, रंगनाथ कोकणे, आरती कोकणे , निर्मला काठे , एकनाथ पवार , सुखदेव मुसळे, बन्सी उघडे, भास्कर पवार , नितीन पवार ,बाळु भले, समाधान कोकणे आदी उपस्थित होते
-------------------
स्टॉल्सने फुलला बाजार : मेळाव्यानिमित्त शालेय आवारात फळे ,भाजीपाला धान्य , भेळभत्ता ,चनाचटपटा व इतर पदार्थाचे निर्जला बोडके ,दक्षा शेलार , विजय भगत , करण उघडे ,दिपक शेलार , समाधान आगीवले, स्वाती मुसळे, गौरी पारधी ,तुषार पवार , रोहित तेलम, संकेत बोडके ,यश कोकणे या शाळकरी विद्यार्थ्यांनी छोटी मोठी दुकाने थाटली होती. या स्टॉल्समुळे शालेय आवाराला बाजाराचे स्वरूप आले होते.

Web Title: Balanand meet in Thrillingwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक