द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:31 IST2018-06-25T00:31:22+5:302018-06-25T00:31:44+5:30

राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे.

 The bacterial bacteria threat to grapefruit | द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका

नाशिक : राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळेही रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात खास काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. तर कांदा उत्पादक शेतकºयांसमोर पावसापासून कांदा वाचविण्याचे संकट उभे असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.  जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना जूनच्या उत्तरार्धात ढगाळ हवामान आणि वादळी वाºयामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या काळात होणाºया गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया यांसारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना कांदा उत्पादक व फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतक ºयांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी किमान ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाच्या अंदाजानुसार पीकपद्धती ठरवा
भारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांबपल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. त्यानुसार ज्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे त्या भागात कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड करावी. त्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा, मूग, मटकी, उडीद, धने तसेच कमी कालावधीचं तुरीचं वाण, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्राधान्य देण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title:  The bacterial bacteria threat to grapefruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी