शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव महिला जळीत प्रकरणी जबानीत तफावत

By admin | Updated: October 19, 2014 16:53 IST

बाभूळगाव महिला जळीत प्रकरणी जबानीत तफावत

येवला : अपेक्षित उमेदवाराला मतदान केले नाही म्हणून बाभूळगाव येथील एका महिलेला संगनमताने तिघांनी रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सदर महिलेच्या मुलीने आई डबा घ्यायला गेली आणि गॅसमुळे पदर पेटल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या घटने संदर्भात पोलीस तपासात वेगळीच परिस्थिती समोर येत आहे ही घटना आणि जबानी यात मोठी तफावत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिने संशयितांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने या तिघांना दि.२० आॅक्टोबरपर्य$ंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या घटनेत महिला ६५ टक्के भाजली असून, ती गंभीर आहे. बाभूळगाव येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरासमोर राहणारी झेलूबाई जगन्नाथ वाबळे ही महिला जळाल्यानंतर आरडाओरड करीत असताना कमलाबाई लोंढे या गवत कापणाऱ्या गावातील महिलेने तिला बघितले होते. सदरची घटना स्टोव्हमुळे झाली नसून गॅसवर साडीचा पदर पेटल्यामुळे झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेत आरोप ठेवलेले तिघे जण बाभूळगावात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. गुण्यागोविंदाने बाभूळगावी राहणारे हे लोक असे कृत्य करू शकत नाही असे त्यांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटना घडली तेव्हा गावात लाईटदेखील नव्हते. यामुळे या तिघांचे चेहरे सदर महिलेला कसे दिसले. असे अनेक प्रश्न हा तपासाचा भाग आहेत. ते अद्याप अनुत्तरीत आहेत. डी.एन.ए.चे नमुनेदेखील तपासासाठी घेतले आहे. घटनेच्या मुळाशी जाऊन तपास चालू आहे. सदर महिलेच्या मुलीची जबानीदेखील सदर महिलेच्या म्हणण्याला छेद देणारी आहे. या घटनेतील आरोपी अशोक बोरनारे हा भाजलेल्या महिलेला वाचविण्यासाठी गेला होता. अशी सर्व माहिती पोलीस अधीक्षक मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी हेही यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी येवला शहर पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, सहायक पोलीस निरीक्षक किरण राठोड हे तपास करीत आहेत. परिस्थिती जन्य पुरावा आणि जबानी यात मोठी तफावत असल्याचे मोहिते म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी येवल्यात भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत. (वार्ताहर)