ब.ना. सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:42 IST2019-07-21T17:41:54+5:302019-07-21T17:42:56+5:30

सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक-शिक्षक संघातर्फे गौरव करण्यात आला.

B. N. Talent students pride in Saadda school | ब.ना. सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ब.ना. सारडा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक-शिक्षक संघातर्फे गौरव करण्यात आला.
सी. ए. व विद्यालयाचे माजी विद्यार्थी अनिल करवा हे प्रमुख पाहुणे होते. प्राचार्य अनिल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचा प्रास्ताविकात माहिती दिली. शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित म्हणाले, की देवाने सर्वांना सारखे गुण दिले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांचे ते गुण हेरतात आणि त्या गुणांचा विकास करतात पाहिजेत. पर्यवेक्षक बाळासाहेब हांडे, रूपेश मुंदडा आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. के. जाधव, संजय वाघ, राहुल मुळे यांनी प्रयत्न केले. रोहिणी परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. रत्नाकर भालेराव यांनी आभार मानले.

Web Title: B. N. Talent students pride in Saadda school

टॅग्स :Schoolशाळा