भोसलाच्या चार शिक्षकांना आदर्श क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 18:42 IST2020-10-04T23:49:55+5:302020-10-05T18:42:31+5:30

नाशिक- रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेप सिटीच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच गंजमाळ येथील ...

Awards to four sports teachers of Bhosla | भोसलाच्या चार शिक्षकांना आदर्श क्रीडा पुरस्कार

भोसलाच्या चार शिक्षकांना आदर्श क्रीडा पुरस्कार

ठळक मुद्देरोटरीच्या वतीने यंदा विविध शाळेतील क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक यांची निवड करण्यत आली

नाशिक- रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेप सिटीच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच गंजमाळ येथील रोटरी हॉल येथे पार पडला. यावेळी भोसला स्कूलच्या चार क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. रोटरीच्या वतीने यंदा विविध शाळेतील क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक यांची निवड करण्यत आली होती. यात राष्ट्रकुल आणि आशियायी क्रीडा स्पर्धेत दबदबा निर्माण करणारे तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग, भोसला येथील जलतरण प्रशिक्षक शंकर मादगुंडी, विद्या प्रबोधीनी प्रशालेतील क्रीडा शिक्षीका क्षीतीजा खटावकर आणि भोसला मिलीटरी स्कूलचे क्रीडा शिक्षक वैभव खवले यांच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक रोटरी आंतरराष्ट्रीय डिस्ट्रीक्टचे नियोजीत गव्हर्नर रमेश मेहेर, रोटरी क्लबच्या अध्यक्ष कविता डगावकर आदी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. क्रीडा प्रशिक्षणाच्या निमित्ताने देश विदेशात नाशिकचे नाव पोहोचवणा-या क्रीडा शिक्षकांविषयी यावेळी रोटरीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Web Title: Awards to four sports teachers of Bhosla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.