अंगणवाडी सेविकांचा टाळनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:22 IST2020-03-04T23:20:32+5:302020-03-04T23:22:40+5:30

नाशिकरोड : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर बुधवारी (दि. ४) टाळनाद भजन मोर्चा काढण्यात आला.

Avoiding Anganwadi Servants | अंगणवाडी सेविकांचा टाळनाद

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तृतीय श्रेणी देण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने केली.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्या : संघाच्या वतीने निदर्शने

नाशिकरोड : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर बुधवारी (दि. ४) टाळनाद भजन मोर्चा काढण्यात आला.
सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनिसांना चतुर्थश्रेणी वेतन देण्यात यावे, मानधनात वाढ करावी, मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, रिक्त जागा भराव्यात, फरकासह प्रोत्साहन भत्ता रक्कम द्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. त्यात सेविका सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Avoiding Anganwadi Servants