शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

पहिल्याच दिवशी कांद्याला सरासरी १४०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 2:24 AM

लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ रुपये अधिकाधिक दर मिळाला. 

नाशिक : लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ रुपये अधिकाधिक दर मिळाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. सोमवारपासून या समित्यांचे कामकाज पूर्ववत होऊन विविध अटी-शर्तींचे पालन करत शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत पहिल्याच दिवशी ४९३ वाहनांमधून १०३३७ क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. सर्व वाहनांमधील लिलाव पूर्ण झाला उन्हाळ कांद्याला किमान ७०० तर सरासरी १४०१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लासलगावी मक्याचीही आवक झाली होती. मक्याला १५३८ रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३८० ट्रॅक्टर आणि ३१० जीप इतकी कांद्याची आवक झाली होती. येथे गावठी कांद्याला सरासरी १५०१ रुपये तर अधिकाधिक २०२० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पिंपळगावी झाली २५ हजार क्विंटल आवकपिंपळगाव बसवंत :  येथील बाजार समिती आवारात रविवारी (दि. २३)  सायंकाळपासूनच बाजार समितीमध्ये परिसरात मोठी गर्दी झाली होती. सोमवारी (दि. २४) कामकाज सुरू झाल्यानंतर कोरोनाचा अहवाल तपासूनच वाहनांना प्रवेश दिला जात होता.  पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला  २ हजार रुपये क्विंटलला भाव जाहीर झाला.  पिंपळगाव बाजार समितीचे ठप्प असलेले कांदा लिलाव दहा दिवसांनंतर सुरू झाल्याने रविवारी सायंकाळी शेकडो वाहने बाजार समिती आवारात दाखल झाली. रविवारीच हजार वाहनांतून सुमारे २५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा