मोबाइलवर शिक्षणक्र म होणार उपलब्ध : दिनेश भोंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST2018-10-28T00:39:17+5:302018-10-28T00:39:49+5:30
ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

मोबाइलवर शिक्षणक्र म होणार उपलब्ध : दिनेश भोंडे
नाशिक : ज्यांना उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच येणाऱ्या काळात मुक्त विद्यापीठातून आॅनलाइन, मोबाइलद्वारे शिक्षणक्र म उपलब्ध करून देण्याचा मानस कुलसचिव दिनेश भोंडे यांनी बोलताना व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कॅनडा कॉर्नरवरील जेएमसीटी वृत्तपत्रविद्या अभ्यास केंद्रात आयोजित युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भोंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेएमसीटीचे अध्यक्ष शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, धनंजय माने, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. यावेळी भोंडे म्हणाले, विविध कारणास्तव ज्यांना शिक्षण अर्धवटस्थितीत सोडावे लागले त्यांच्यासाठी मुक्त शिक्षणप्रणालीची पद्धत यशस्वी ठरणारी आहे. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते युवक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जेएमसीटी वृत्तपत्रविद्या अभ्यास केंद्राचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. शास्त्रीय गायन, सुगम गायन, वाद्यवादन, स्थळचित्रकला, छायाचित्रण, मृदा मूर्तिकला, वक्तृत्व, वादविवाद, मूकअभिनय, शास्त्रीयनृत्य, पाश्चात्य नृत्य आदी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विभागातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक केंद्रातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेतील विजेते ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्रकाचे वाटप करण्यात आले. स्वागत केंद्र संयोजक श्रीकांत सोनवणे यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी केले. परीक्षक म्हणून ज्योती चव्हाण, आसावरी भट, विजय धरणे, शुभम सोनवणे अमित गांगुर्डे यांनी काम पाहिले.