शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आॅस्ट्रेलियन कंपनीची नाशिकमध्ये गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:41 IST

नाशिक भेटीवर आलेल्या आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार; गुंतवणूकदारांचा दावा

सातपूर : नाशिक भेटीवर आलेल्या आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणुकीबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार अर्बन वॉटर फाउंटनचे व्यवस्थापकीय संचालक गॅरी अलन आणि संचालक सायमन हिंगीस नाशिक भेटीवर आले असता त्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीला भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश पाटील, राम पाटील, राजेंद्र अहिरे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे कंपनीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्र मात खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी यांनी या परदेशी गुंतवणूकदारांचे स्वागत करून भारत सरकारतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आॅस्ट्रेलियन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भेट घेऊन नाशिकमध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे निरिक्षण नोंदविले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजलाल जनवीर आदी उपस्थित होते.शुद्ध पाणी देणारे उत्पादनआॅस्ट्रेलियन उत्पादनाचे नाशिकमध्येही उत्पादन करून हे शुद्ध पाणी देणारे उत्पादन सार्वजनिक सोसायट्यांमध्ये, उद्यानात, जॉगिंगपार्क , रेल्वे स्टेशन, बसस्टेशन, ग्रामीण व आदिवासी भागात बसविता येऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील. तसेच हे पर्यावरणाला पूरक असे उत्पादन असल्याची माहिती दिली. बदलत्या वातावरणात शहरातील नागरिकांसाठी सदर उत्पादन उपयुक्त ठरणार असल्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होऊ शकते. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या या उत्पादनामुळे नवीन व्हेंडर बेस तयार होईल व नवीन रोजगारदेखील निर्माण होऊ शकतो, असाही विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :businessव्यवसाय