पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद

By प्रसाद गो.जोशी | Updated: June 2, 2025 15:43 IST2025-06-02T15:42:47+5:302025-06-02T15:43:23+5:30

चौथ्यांदा टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन तरी निर्णय लागेना ...

Auction in Pimpalgaon closed due to lack of money by tomato farmer | पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद

पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद

- गणेश शेवरे

पिंपळगाव बसवंत :  पिंपळगाव बाजार समितीच्या मार्फत एका व्यापाऱ्याने टोमॅटो खरेदी केले होते मात्र सात महिन्यांपेक्षा जास्त दिवस होऊनही शेतकऱ्यांचे  पैसे दिले नाही. यामध्ये सुमारे ३०० शेतकऱ्यांचे दोन कोटी पस्तीस लाख रुपये अडकलेले आहेत.  

आतापर्यंत शेतकऱ्यांनी तीन वेळा आंदोलन केले. मात्र आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे पुन्हा चौथ्यांदा शेतकऱ्यांनी आक्रमक होत सोमवारी सकाळीच  पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.

जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू करू देणार नाही असा पवित्रा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.  यामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्या असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

Web Title: Auction in Pimpalgaon closed due to lack of money by tomato farmer

टॅग्स :Farmerशेतकरी