बेड्या ठोकताच तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:54 IST2019-04-21T00:53:51+5:302019-04-21T00:54:06+5:30
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

बेड्या ठोकताच तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
पंचवटी : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत समावेश असलेला हनुमानवाडीतील तडीपार गणेश ऊर्फ बाला भास्कर कालेकर हा शस्त्राचा धाक दाखवून गोदाकाठावर दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होता. त्यास पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर चाल केली, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या.
गुरु वारी रात्री पंचवटीत विशेष मोहीम राबविली जात होती. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला असताना तडीपार केलेला संशयित गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कालेकरवर विविध गुन्हे दाखल
कालेकरवर शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, पोलिसांवर हल्ला अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहे.