राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:23 IST2020-02-20T16:17:32+5:302020-02-20T16:23:58+5:30

चांदवड - चांदवड तालुक्यातील राहुड येथील रत्नाबाई गुलाब वानखेडे ( ४०) या महिलेस बुधवार दि.१९ डिसेंबर रोजी तिचा पती गुलाब जिजाबा वानखेडे यांने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन,अंगावर डिझेल व रॉकेल टाकून पेटवून जाळून टाकून मारण्याचा प्रयत्न केला

An attempt to burn a woman at Rahud | राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न

राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देपती गुलाब जिजाबा वानखेडे यांने पत्नीच्या चरित्र्यावर संशय

चांदवड - चांदवड तालुक्यातील राहुड येथील रत्नाबाई गुलाब वानखेडे ( ४०) या महिलेस बुधवार दि.१९ डिसेंबर रोजी तिचा पती गुलाब जिजाबा वानखेडे यांने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन,अंगावर डिझेल व रॉकेल टाकून पेटवून जाळून टाकून मारण्याचा प्रयत्न केला. तर तिची आई लिलाबाई गंगाराम देवरे (६५) रा. झोडगे ता. मालेगाव ही सोडविण्यास गेली असता तिला गजाने कपाळावर मारुन डोके फोडले. त्यानंतर गुलाब वानखेडे याने राहत्या घरात फाशी घेण्याचा प्रयत्न केला त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.पत्नी रत्नाबाई हिस चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले तर गुलाब वानखेडे यास मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Web Title: An attempt to burn a woman at Rahud